शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

आता बँकेत नाही बदलून मिळणार जुन्या नोटा..

By admin | Updated: November 18, 2016 17:28 IST

बँकेतून (५०० व १ हजार रुपयांच्या) जुन्या नोटा बदलून मिळण्याचा निर्णय लवकरच रद्द होणार असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - बँकेतून जुन्या नोटा बदलून मिळण्याचा निर्णय लवकरच रद्द होणार असल्याचे वृत्त आहे. बँकेतून ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याच्या सवलतीचा काही लोकांकडून गैरफायदा घेण्यात येत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काळ्या पैशाविरोधातील मोहिम तीव्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात ५०० व १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बँकेतून ४५०० रुपयांपर्यंतची रक्कम बदलून घेता येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकेबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या. मात्र च काही काळा पैसा धारकांनी आपल्याकडील बेहिशोबी रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी रोजंदारीवर माणसे लावत काळा पैसा बदलून घेतला.  रोख रकमेच्या तुटवड्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली, परिणामी बँकांबाहेरील रांगाही वाढत गेल्या. 
मात्र आता आठवड्याभरानंतर पुरेशा नोटा चलनात आल्या असून बँका तसेच एटीएममध्येही पैसे मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
याच पार्श्वभूमीवर जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नागरिकांना बँक खात्यात (जुन्या नोटा) पैसे जमा करावे लागणार आहेत. व त्यानंतर बँक खात्यातून वा एटीएममधून ते पैसे काढून घेता येतील.
मात्र ज्या नागरिकांचे बँक खाते नाही, त्यांची गैरसोय होणार असून त्यांना नोटा कशा बदलून मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  
(उद्यापासून बँकेतून बदलून मिळणार फक्त २००० रुपयांच्या नोटा)
  •