आता नॅनोवायर करणार मानवी शरीरातील पेशींची सुरक्षा
By Admin | Updated: December 6, 2014 23:53 IST2014-12-06T23:53:47+5:302014-12-06T23:53:47+5:30
व्हॅनाडियापासून तयार केलेल्या नॅनोवायरच्या माध्यमातून आता मानवी शरीरातील पेशींची सुरक्षा करता येणो शक्य होणार आहे.

आता नॅनोवायर करणार मानवी शरीरातील पेशींची सुरक्षा
अकाली वृद्धत्वावर मात करण्याची क्षमता : अनेक रोगांवरील औषध विकसित करण्यास होणार मदत
नवी दिल्ली : व्हॅनाडियापासून तयार केलेल्या नॅनोवायरच्या माध्यमातून आता मानवी शरीरातील पेशींची सुरक्षा करता येणो शक्य होणार आहे. या नॅनोवायरद्वारे मानवी शरीरातील पेशींना अपाय करणा:या ऑक्सिडंटवर कृत्रिम पद्धतीने नियंत्नण मिळविता येणो शक्य असल्याचे बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील (आयआयएससी) संशोधकांना आढळून आले आहे.
या नव्या संशोधनामुळे वृद्धत्व, हृदयरोग आणि पार्किनसन्स व अल्झायमर्स यासारख्या मज्जातंतूशी संबंधित समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी औषधी विकसित करण्याच्या कामात मदत मिळू शकेल. व्हॅनाडियम ऑक्साईड किंवा व्हॅनाडिया हा धातू टिटानियमशी मिळताजुळता धातू आहे. भारतीय विज्ञान संस्थेतील प्रा. जी. मुगेश आणि पॅट्रिक डिसिल्वा यांनी हे संशोधन केले आहे.
मानवी शरीरात सामान्य चयापचय क्रियेदरम्यान रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती (आरओएस) तयार होतात. अशा प्रजातींची संख्या वाढल्यास पेशींमधील प्रथिने, स्निग्धांश आणि डीएनएवर त्या परिणाम करतात. त्यामुळे अकाली केस गळणो , अकाली वृद्धत्व, कर्करोग, मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार, संधिवात यासारखे विकार उद्भवू शकतात. ‘ऑक्साईडविरोधी औषधांच्या माध्यमातून अशा घातक प्रजातींवर मात करता येते; परंतु त्यातूनही पुन्हा काही प्रमाणात या प्रजाती निर्माण होतात. त्यामुळे आम्ही नैसर्गिक पद्धतीने यावर मात करण्याच्या तंत्नावर लक्ष केंद्रित केले,’ असे प्रा. जी. मुगेश आणि डिसिल्व्हा यांनी सांगितले.
या संशोधनाअंतर्गत नॅनोवायरच्या माध्यमातून ऑक्साईडविरुद्ध नैसर्गिक द्रव्यांप्रमाणो काम करणारे हुबेहूब कृत्रिम ऑक्सिडंटविरोधके निर्माण करण्यात आली. या अपायकारक ऑक्सिडंटविरुद्ध काम करण्यासाठी शरीरामध्ये असंख्य प्रकारच्या यंत्रणा आहेत; परंतु आजारपणाच्या काळात शरीरात ऑक्सिडंट वाढते आणि त्याविरुद्ध काम करणारी नैसर्गिक यंत्रणाही काम करणो थांबविते. अशावेळी नॅनोवायरवर आधारित कृत्रिम यंत्रणा त्यावर नियंत्रण मिळवू शकते, असे त्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4‘निसर्गाशी संवाद’ या नावाचे मुगेश व डिसिल्व्हा यांनी आपले संशोधन प्रकाशित केले आहे. व्हॅनाडिया नॅनोवायर नैसर्गिक अँटीऑक्सिडंट एंजाईनची नक्कल करतो, असे या दोघांनी सिद्ध करून दाखविले आहे. नॅनोवायर जैवरासायनिक प्रतिक्रिया करते आणि मार्गाचा संकेत देण्यासाठी दुय्यम संदेशवाहक म्हणून काम करते. मानवी शरीरात सामान्य चयापचयासाठी त्याची आवश्यकता असते.
4मानवी शरीरामध्ये अशा रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजातींना आणि प्रामुख्याने हायड्रोजन पेरॉक्साईडला बाहेर काढण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली कार्यरत असते. परंतु जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा या रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजातींची संख्या वाढते आणि नैसर्गिक स्वच्छतेची प्रणाली दुबळी होते. अशावेळी आपल्याला या रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजातींवर नियंत्रण मिळविणो आवश्यक असते, असे डिसिल्व्हा म्हणाले.
4रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती जेव्हा वाढतात तेव्हा व्हॅनाडिया नॅनोवायरद्वारे त्यांना वाढण्यास अटकाव करता येतो व पेशींचे नुकसान टाळता येते, असे या संशोधकांचे म्हणणो आहे. शरीरातील पेशींत या नॅनोवायरचा प्रवेश फार महत्त्वाचा आहे. कारण स्वच्छता करण्यासाठी नॅनोवायर पेशींच्या आत प्रवेश करणो आवश्यक आहे. त्यामुळे नॅनोवायरचा पेशींमधील प्रवेश सुलभ करण्यासाठीही त्यांनी उपाय सुचविला आहे.