शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आता मुस्लिम महिलांना हज यात्रेला एकट्यानं जाण्याचा अधिकार- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 13:22 IST

नवी दिल्ली- ट्रिपल तलाकविरोधात लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हज यात्रेसंदर्भात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे.

नवी दिल्ली- ट्रिपल तलाकविरोधात लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हज यात्रेसंदर्भात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. पुरुषांशिवाय महिला हज यात्रेला जाऊ शकत नसल्याची प्रथा अन्यायपूर्ण आहे. ही प्रथा आम्ही संपुष्टात आणल्यामुळे आता पुरुषांशिवायही महिला हज यात्रेला जाऊ शकतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच मला समजलं की, मुस्लिम महिलेला हज यात्रेला जाण्यासाठी पुरुषाची सोबत आवश्यक असल्याची प्रथा आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. परंतु आता महिला एकट्याही हज यात्रेला जाऊ शकणार आहेत. आम्ही या नियमांत बदल केला आहे. यंदा 1300 मुस्लिम महिलांनी पुरुष सदस्याशिवाय हज यात्रेला जाण्यास अर्ज केला आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही हा भेदभाव कायम होता. मुस्लिम महिलांवर असा अन्याय कसा झाला, हे ऐकून मी हैराण होतो. त्यानंतर मीही प्रथा मोडीत काढली. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार मिळाले पाहिजेत, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2018 या वर्षाचं स्वागत सकारात्मकरीत्या होणार आहे. तरुणांचा नवा भारत जात-पात, दहशतवाद, भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. स्वच्छता ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, स्‍वच्छता अभियानाची तपासणी 4 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाक