आता सर्वांच्या नजरा १५ सप्टेंबर रोजीच्या नजर पैसेवारीकडे

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30

एरंडोल : तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगले अस्तित्व जाणवले. नंतर पावसाने मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. आता पाऊस पडला तरी दृष्काळसदृश्य परिस्थिती बदलू शकत नाही. म्एणून या वर्षाा तरी ५० पैशांच्या आत पैसेवारी लागणार काय याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Now look at everyone's eyes on 15th September | आता सर्वांच्या नजरा १५ सप्टेंबर रोजीच्या नजर पैसेवारीकडे

आता सर्वांच्या नजरा १५ सप्टेंबर रोजीच्या नजर पैसेवारीकडे

ंडोल : तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगले अस्तित्व जाणवले. नंतर पावसाने मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. आता पाऊस पडला तरी दृष्काळसदृश्य परिस्थिती बदलू शकत नाही. म्एणून या वर्षाा तरी ५० पैशांच्या आत पैसेवारी लागणार काय याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महसूल यंत्रणेतर्फे नजर पैसेवारी लावण्याचे काम सुरू होणार. केवळ शासनाची बाजू न घेता वस्तुस्थितीला धरून पैसेवारी लावणे आवश्यक आहे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.
रोज ढगाळ वातावरण राहते पण पावसाचा मागमूस नाही. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभा असलेला हिरवा चारा शेतकर्‍यांना दिलासा देणे अशक्य आहे. शासनाने आता बळीराजाच्या सहनशिलतेचा अंत न पाहता दुष्काळ जाहीर करावा व कर्ज वसुलीला स्थगिती, वगैरे सवलतींचा लाभ शेतकर्‍यांना द्यावा, अशी आर्त हाक दिली जाते.
विशेष हे की, यावर्षी पावसाळा संपत आला तरी अंजनी नदीसह नाले-ओढ्यांना एकही पूर आला नाही. नदीनाले कोरडेठाक आहेत. (वार्ताहर)

एरंडोल येथे गटारींच्या बांधकामात गैरव्यवहार
इं.काँ.चे जिल्हा सरचिटणीस विजय महाजन यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
एरंडोल : येथील नगरपालिकेने केलेल्या २ कोटींच्या आरसीसी गटारींच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा इं.काँ.चे सरचिटणीस विजय पंढरीनाथ महाजन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदर गटारींच्या बांधकामात आसारी वापरलेली नसून लांबी, रुंदी अंदाजपत्रकानुसार नाही. काँक्रीट करताना दगड गोटे भरुन काँक्रीट ओतलेले आहे. गटारींचे बांधकाम कागदावर ठेकेदाराला दिल्याचे दर्शविण्यात आले असून प्रत्यक्षात न.पा. प्रशासनानेच काम केलेले आहे. असा आरोप तक्रारी अर्जाद्वारे करण्यात आला आहे.
या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. या प्रकरणी क्वालिटी कंट्रोल व व्हीजीलन्स खात्याकडून चौकशी व्हावी, अशीे मागणी करण्यात आली आहे.
सदर तक्रारी अर्जांच्या प्रती मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)

एरंडोल तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात आमदार डॉ.सतीश पाटील यांनी ३ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली
एरंडोल- अपुर्‍या पावसामुळे तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गुरुवारी, ३ सप्टेंबर रेाजी तहसील कार्यालय, एरंडोल येथे बैठक आयोजित केली आहे.
पैसेवारी ५० च्या आत लावणे, पाणीटंचाई, चाराटंचाई आदी विषयांवर यावेळी चर्चा होईल. या बैठकीसाठी सर्व स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल विक्रेते, तहसील कार्यालयांचे कर्मचारी व अधिकारी, तहसीलदार मिनाक्षी राठोड, तलाठी, मंडळ अधिकारी व इतर यंत्रणांचे प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, वि.का. संस्थांचे चेअरमनसह सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Now look at everyone's eyes on 15th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.