शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:36 IST

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात...!

ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर, आता भारताने आपली लष्करी ताकद आणखी वाढविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, आता भारत पुढील चार वर्षांत अर्थात २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. हे सर्व उपग्रह चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर लक्ष ठेवतील. हे सर्व उपग्रह आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) बेस्ड असतील.

गेल्या वर्षीही देण्यात आली होती कोट्यवधींची मंजुरी -ही संपूर्ण मोहीम संरक्षण अंतराळ संस्थेअंतर्गत चालवली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा व्यवहारांसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीने यासाठी २६,९६८ कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेंतर्गत, इस्रो २१ उपग्रह तयार करून प्रक्षेपित करणार आहे, तर तीन भारतीय खाजगी कंपन्या ३१ उपग्रह तयार करतील.

पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल -हे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिट आणि जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये तैनात केले जातील. पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेस-बेस्ड सर्व्हिलान्सच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (SBS-3) हे सर्व सुरू आहे. 

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात - एसबीएस-3 चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकांश भागांवर लक्ष ठेवणे असा आहे. याने हिंदी महासागरावरही लक्ष ठेवले जाईल. हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे म्हणून कार्यरत राहतील. तसेच मेसेज आणि फोटो पाठवत राहतील. यामुळे भारताची सुरक्षितता आणखी बळकट होईल.

टॅग्स :Governmentसरकारisroइस्रोPakistanपाकिस्तानchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी