शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आता हार्वर्ड, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड तुमच्या दारी, मायदेशात पाश्चिमात्य शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:26 IST

यूजीसी नियामक यंत्रणा बनविणार, भारतीय विद्यापीठांनाही परदेशातील कवाडे खुली

शरद गुप्तानवी दिल्ली : भारतीयांना परदेशातील विद्यापीठांमध्येशिक्षणाची भारी हाैस. दरवर्षी भारतातून शेकडाे विद्यार्थी परदेशातील हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि एमआयटी यासारख्या विद्यापीठांमध्येशिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. मात्र, आता या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी परदेशवारीची गरज नाही. यापैकी काही नामांकित विद्यापीठ लवकरच भारतात कॅम्पस सुरू करणार आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील आघाडीच्या शिक्षण संस्थांसाठीही सुमारे १५ देशांनी दारे उघडले आहे.

जगभरातील आघाडीच्या १०० विद्यापीठांनी भारतात यावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयाेग (यूजीसी) प्रयत्नशील आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी ‘लाेकमत’ला सांगितले, की मी काेणत्याही एका विद्यापीठाचे नाव घेणार नाही. मात्र, एवढे सांगू शकताे, की अनेक आघाडीच्या विद्यापीठांनी भारतात कॅम्पस सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अलिकडेच मी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांना भेटलाे हाेताे. तसेच अमेरिकेतील भारतीय राजदूतांचीही मी भेट घेतली हाेती. इटलीच्या राजदूतांनी भारतात फॅशन डिझाइनिंगचे कॅम्पस सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

n परदेशी विद्यापीठांना अभ्यासक्रम ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य राहणार आहे. विद्यापीठांच्या स्वायत्ततेमध्ये अनुदान आयाेग हस्तक्षेप करीत नाही. भारतीय विद्यापीठांमध्येही अभ्यासक्रम ठरविण्यासाठी अभ्यास मंडळे असतात. n त्याचप्रमाणे परदेशी विद्यापीठांनाही संपूर्णपणे स्वायत्तता असेल. मात्र, त्यांना भारतीय विद्यापीठांप्रमाणे पदवी प्रमाणपत्रे द्यावी लागतील, असे प्रा. कुमार यांनी स्पष्ट केले.

अनिवासी भारतीयांना हाेणार फायदापरदेशातील लाेकांना भारतीय शिक्षण पद्धतीचा प्रचंड आदर आहे. इथे उपलब्ध असलेले उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या देशात मिळावे, असे त्यांना वाटते. याशिवाय माेठ्या प्रमाणावर अनिवासी भारतीयांनाही भारतीय संस्थांमध्ये शिक्षण घ्यायला आवडेल, असे प्रा. कुमार म्हणाले.

आयआयटी, आयआयएमलाही परदेशात संधीभारतातील आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी यासारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांनाही परदेशात कॅम्पस सुरू करण्यासाठी काही देशांनी ऑफर दिली आहे.  आपल्या विद्यापीठांना परदेशात कॅम्पस सुरू करण्यास अंतिम स्वरूप देण्यासाठी इस्राेचे माजी अध्यक्ष डाॅ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठEducationशिक्षण