शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

आता मणिपूरमधून होणार घुसखोरांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 6:00 AM

१९५१ नंतर आलेले मूळचे नागरिक मानणार नाही

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : स्थलांतरित कुटुंबे किंवा घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने राष्टÑीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) कार्यवाही सुरू केल्यानंतर, आता ईशान्येकडील मणिपूरमधील भाजपा सरकारनेही घुसखोरांची हकालपट्टी करून, मूळच्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारे मणिपूर जनता विधेयक संमत केले आहे.त्यानुसार, १९५१ नंतर आलेल्यांना मणिपूरचे मूळ नागरिक मानले जाणार नाही. त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. राज्यात संपत्ती उभी करण्यास व वास्तव्यही करण्यासही निर्बंध घालण्यात येणार आहेत. मूळचे रहिवासी मणिपूरचे नसलेल्या लोकांनी ठरलेल्या मुदतीमध्ये विशेष प्रवेश परवाना घ्यावा, असे या विधेयकात आहे. याला केवळ राज्यपालांची मंजुरी मिळणे बाकी आहे. या विधेयकामुळे मोदी सरकार द्विधा स्थितीत सापडले असून, राज्यपाल नजमा हेपतुल्ला यासुद्धा चिंतेत असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्र सरकारला या स्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. तथापि, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे मात्र विधेयकासाठी आग्रही आहेत.व्यापाऱ्यांना गाशा गुंडाळावा लागेलया विधेयकामुळे बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या अवैध कुटुंबासह १९६० आणि १९७० च्या दशकांत मुंबई, पश्चिम बंगाल, राजस्थानातून व्यापार उद्योगासाठी आलेले हजारो व्यापारी, व्यावसायिक, तसेच कामगारांनाही गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापारी भीतीच्या छायेत आहेत.मूळचे मणिपुरी कसे ठरवणार?मणिपूरमध्ये १९५१ची राष्टÑीय नागरिक नोंदणीच नाही. तेव्हा १९५१चे मूळचे मणिपुरी कोण? हे कसे ठरविणार, याचे उत्तरही मुख्यमंत्र्यांकडे नाही. यामुळे भाजपाला येथे प्राबल्य असलेल्या समुदायाच्या बळावर लोकसभा, विधानसभेच्या बव्हंशी जागा मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठीला पटवून दिल्याचे समजते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी