शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:08 IST

भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.

नवी दिल्ली - भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. मूडीजच्या रेटिंगमुळे उत्साहित असलेल्या जेटली यांनी ज्यांना आर्थिक सुधारणेबाबत शंका आहे, त्यांनी स्वत:चे गंभीर आकलन केले पाहिजे असा टोला यशवंत सिन्हा यांना लगावला होता. त्याला सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यानंतरही यशवंत सिन्हा यांच्या शंकांचे निरसन झालेले नाही. त्यांनी मूडीजच्या रेटिंगनंतर सरकारने व्यक्त केलेल्या आनंदावर आक्षेप घेतला आहे. मूडिजने रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने आता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यास हरकत नाही असा तिरकस टोला त्यांनी लगावला.   " मूडीडने भारताच्या मानांकनात केलेल्या सुधारणेचे आम्ही स्वागत करतो. केंद्रात सत्तेवर असलेल्या आमच्या सरकारने गेल्या काही वर्षांत आर्थिक सुधारणा करण्यासाठी उचललेल्या सकारात्मक पावलांचा परिणाम या बदललेल्या रेटिंगमध्ये दिसून आला आहे. या बदललेल्या रेटिंगमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल." असे मूडीजच्या रेटिंगवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुण जेटली म्हणाले होते. तसेच त्यांनी यशवंत सिन्हांनाही टोला लगावला होता. आंतरराष्ट्रीय रेटिंग्ज एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने  'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे.  या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2  करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे. "भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल. याआधीही उद्यम सुलभतेत भारताने उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल केंद्र सरकारला जगातिक संस्थांची शाबासकी मिळाली आहे.  

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाArun Jaitleyअरूण जेटलीIndiaभारत