आता दिल्लीत महापुरूषांच्या नावे असलेल्या सुट्ट्या रद्द

By Admin | Updated: April 28, 2017 18:53 IST2017-04-28T18:53:34+5:302017-04-28T18:53:34+5:30

उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने सुद्धा महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Now in Delhi, the names of the great men have been canceled | आता दिल्लीत महापुरूषांच्या नावे असलेल्या सुट्ट्या रद्द

आता दिल्लीत महापुरूषांच्या नावे असलेल्या सुट्ट्या रद्द

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने सुद्धा महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात आदेश दिले असून त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या  निर्णयाचे स्वागत केले आहे.  
यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. दिल्ली सरकार इतर राज्यांकडून शिकण्यासाठी नेहमीच तयार आहे. मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा हटविण्याचा दिल्ली सरकारने घेतलेला निर्णय आणि विभागीय क्लिनिक देशभर राबविण्यात येत आहे. तसेच, आम्हाला सुद्धा दुस-यांकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत.  
दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या एकूण 15 सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. 

Web Title: Now in Delhi, the names of the great men have been canceled