शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus News : आता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 17:54 IST

ज्या रुग्णालयांना हे हॉटेल्स अॅटॅच करण्यात येणार आहेत, त्यात सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल, राजेंद्र प्‍लेस येथील बीएल कपूर हॉस्पिटल, साकेत येथील मॅक्‍स हॉस्पिटल, करोल बाग जवळील सर गंगा राम हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि रुग्णालयांतील बेडची कमतरता लक्षात घेत, दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.5 जूनपर्यंत दिल्लीत 9500 बेड उपलब्ध असतील.

नवी दिल्‍ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि रुग्णालयांतील बेडची कमतरता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने खासगी हॉटेल्‍सना रुग्णालयात रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दिल्‍ली सरकारने खासगी हॉटेल्स टेकओव्हर करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे आता दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात बेड नाहीत म्हणून भटकण्याची वेळ येणार नाही. 

हॉटेल्स ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू -जे हॉटेल टेकओव्हर केले जात आहेत. त्यात दिल्लीतील सूर्या हॉटेल, क्राउन प्‍लाझा, सिद्धार्थ हॉटेल, शेरटन हॉटेल आणि जीवीतेश हॉटेलचा समावेश आहे. ही पाचही हॉटेल्स दिल्‍लीतील पाच मोठ्या रुग्णालयांशी अॅटॅच करण्यात येणार आहेत. दिल्‍ली सरकारने अॅटॅच करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

 दिलासादायक! देशात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्ण घटले, 24 तसांत तब्बल 11 हजार जण ठणठणीत होऊन घरी परतले

दिल्‍ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णालयांना हे हॉटेल्स अॅटॅच करण्यात येणार आहेत, त्यात सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल, राजेंद्र प्‍लेस येथील बीएल कपूर हॉस्पिटल, साकेत येथील मॅक्‍स हॉस्पिटल, करोल बाग जवळील सर गंगा राम हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

मुख्‍यमंत्री म्हणाले, रुग्णालयांत बेटची कमतरता नाही -दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात बेटची कमतरता भासून नये, ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ नये, याची व्यवस्था करण्यात आली आहे. 2100 रुग्ण सध्या रुग्णालयात आहेत. एक आठवड्यापूर्वी 4500 बेड होते. यात आणखी 2100 बेड वाढवण्यात आले आहेत. म्हणजे आता एकूण 6600 बेड उपलब्ध आहेत. 5 जूनपर्यंत दिल्लीत 9500 बेड उपलब्ध असतील. केजरीवाल म्हणाले खासगी रुग्णालयांत 2500हून अधिक बेड आहेत. ते 5 जूनपर्यंत 3600हून अधिक करण्यात येतील. सरकारी रुग्णालयातही सरकारने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे. तसेच रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत यासाठी हॉटेल्सदेखील टेकओव्हर केली जात आहेत. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालhotelहॉटेलhospitalहॉस्पिटल