देशभरातील विमानतळांवर आता बोर्डिंग पास व्यवस्था संपणार, बायोमॅट्रिक्स प्रणालीचा होणार उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:58 IST2017-09-18T01:58:06+5:302017-09-18T01:58:10+5:30
देशभर विमानतळांवर बोर्डिंग पास गोळा करण्याची व्यवस्था संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी बायोमॅट्रिक्सच्या मदतीने एक्स्प्रेस चेक इन व्यवस्था राबविली जाईल.

देशभरातील विमानतळांवर आता बोर्डिंग पास व्यवस्था संपणार, बायोमॅट्रिक्स प्रणालीचा होणार उपयोग
नवी दिल्ली : देशभर विमानतळांवर बोर्डिंग पास गोळा करण्याची व्यवस्था संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी बायोमॅट्रिक्सच्या मदतीने एक्स्प्रेस चेक इन व्यवस्था राबविली जाईल. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सकडे (सीआयएसएफ) देशातील विमानतळ सुरक्षेची जबाबदारी आहे. सीआयएसएफचे महाव्यवस्थापक ओ. पी. सिंह म्हणाले की, ‘५९ विमानतळांवर बोर्डिंग पासविरहित व्यवस्था राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा शोध आम्ही घेत आहोत.’