शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

आता भाजपाला येणार ‘बुरे दिन’

By admin | Updated: January 16, 2017 04:55 IST

नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून, देशातील ९० टक्के जनतेला कंगाल केले

मीना कमल,

लखनौ- नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून, देशातील ९० टक्के जनतेला कंगाल केले असून, उत्तर प्रदेशातील जनतेला त्याचा मोठाच फटका बसला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मतदार विधानसभा निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी दिला. आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्याद्वारे त्यांनी बसपाच्या प्रचाराची रणनीतीच निश्चित केली.राज्यातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी स्वबळावरच लढेल आणि कोणाशीही समझोता करणार नाही, असे सांगून मायावती म्हणाल्या की, भाजपाने सत्तेत येण्यासाठी जनतेला अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. पण आता भाजपाचे बुरे दिन येणार आहेत. नोटाबंदीचा मोठा फटका गरीब व मध्यमवर्गालाच बसला. त्यामुळे हे सारे संतापलेले मतदार भाजपाच्या विरोधात मतदान करतील, याबद्दल माझ्या मनात काडीमात्र शंका नाही.काँग्रेसकडे गांभीर्याने पाहण्याचे कारण नाही, कारण उत्तर प्रदेशात हा पक्षच शिल्लक राहिलेला नाही, असे सांगताना मायावती यांनी समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्या छुपा समझोता झाला असल्याचाही आरोप केला. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशचे मोठे नुकसान गेल्या पाच वर्षांत केले. आता तर तिथे बाप आणि बेटा यांचेही पटत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या एकीकडे काँग्रेसशी समझोता करण्याची भाषा अखिलेश यादव यांचे समर्थक करीत आहेत. पण प्रत्यक्षात भाजपाचा फायदा व्हावा, अशीच त्यांची पावले पडत आहेत.सक्तवसुली संचालनालयाने बसपाच्या खात्यामध्ये १०४ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या निवडणुका जवळ आल्याबरोबरच चौकशी मागे लावण्याचा आणि बसपाला त्रास देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहेत. आपल्या भावाच्या अवाढव्य मालमत्तेच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचाही उल्लेख करीत, माझ्या भावाने नियमांचे उल्लंघन करून, इतकी मालमत्ता जमवली असे सरकारला म्हणायचे असेल, तर गेली अडीच वर्षे मोदी सरकार का गप्प होते? इतके दिवस भावावर का कारवाई झाली नाही? निवडणुका तोंडावर येताच त्यांना भावाच्या मालमत्तेची आठवण कशी झाली? असे सवाल त्यांनी केले. >विविध राजकीय पक्षांतील ३00 बड्या नेत्यांच्या संपत्तीची चौकशी केली, तर बरेच काही उघड होईल, असे सांगतानाच मायावती यांनी भाजपा नेत्यांच्या बँक खात्यांची माहिती उघड करण्यात यावी आणि या नेत्यांनी नोटाबंदीच्या आधी १0 महिने काय बँक व्यवहार केले, तेही उघड करावेत, अशी मागणी केली.