शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 07:51 IST

एका मुलाखतीत भाजप रा.स्व. संघाची मदत घेतो का, यासंदर्भातील प्रश्नावर  नड्डा म्हणाले की, भाजप आता मजबूत पक्ष झाला आहे.

नवी दिल्ली : प्रारंभी रा.स्व. संघाच्या मदतीची आम्हाला निश्चितच आवश्यकता भासत होती; पण आता भाजप सक्षम झाला असून, स्वबळावर सारे निर्णय घेत आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केले. 

एका मुलाखतीत भाजप रा.स्व. संघाची मदत घेतो का, यासंदर्भातील प्रश्नावर  नड्डा म्हणाले की, भाजप आता मजबूत पक्ष झाला आहे. प्रत्येक कार्यकर्ता, नेत्यावर विशिष्ट जबाबदारी सोपविली आहे. संघ ही सांस्कृतिक व सामाजिक संघटना आहे, तर भाजप राजकीय पक्ष आहे. संघ हा वैचारिक आघाडीचे काम करतो, तर भाजप आपले राजकीय कार्य करतो. भाजप स्वबळावर सारे निर्णय घेतो. एखाद्या राजकीय पक्षाने याच पद्धतीने काम करणे अपेक्षित असते. 

मथुरा, काशी येथील वादग्रस्त ठिकाणी भविष्यात मंदिरे उभारण्याची भाजपची योजना नसल्याचे नड्डा यांनी सांगितले. भाजपला मनात अशी काही संकल्पना किंवा इच्छाही नाही. पक्षात कधी त्याची चर्चाही झाली नाही. पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्यानुसारच धोरणे ठरविली जातात, असे नड्डा म्हणाले. गरीब, शोषित, महिला, युवक, शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचेही नड्डा  यांनी यावेळी नमूद केले.

भाजप संघावर बंदी घालू शकतो : ठाकरेरा. स्व. संघाचे १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजप संघालाही नकली संघ म्हणू शकतो. भाजप संघावर बंदीही घालू शकतो, अशी टीका उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

‘राम मंदिर उभारणीचा विषय भाजपच्या अजेंड्यावर होता’अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर राम मंदिर उभारले जावे, अशी मागणी भाजपने पालमपूरच्या अधिवेशनात जून १९८९ मध्ये केली होती. प्रदीर्घ संघर्षानंतर आता रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. हे राम मंदिर आमच्या अजेंड्यावर होते. भाजप हा एक मोठा पक्ष आहे. त्यातील प्रत्येक नेत्याची बोलण्याची वेगळी शैली आहे, असे म्हणत पक्षाध्यक्ष नड्डा यांनी पक्षांतील नेत्यांच्या विधानावर भाष्य केले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारण