मॅगीनंतर आता पास्ता, मॅक्रोनीही रडारवर

By Admin | Updated: June 7, 2015 01:26 IST2015-06-07T01:26:28+5:302015-06-07T01:26:28+5:30

नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आता

Now after the Magi, the pasta, the macroeo the radar | मॅगीनंतर आता पास्ता, मॅक्रोनीही रडारवर

मॅगीनंतर आता पास्ता, मॅक्रोनीही रडारवर

नवी दिल्ली : नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आता आपला मोर्चा इतर कंपन्यांच्या नूडल्सकडे वळविला असून, त्यांच्याही नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय ब्रॅण्डेड पास्ता आणि मॅक्रोनी उत्पादनांचीही चाचणी करण्यात येईल, असे प्राधिकरणातर्फे शनिवारी सांगण्यात आले. परंतु ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडरविरुद्ध कारवाईचा मात्र तूर्तास विचार नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) युद्धवीरसिंग मलिक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, इतर ब्रॅण्डच्या नूडल्सचीही तपासणी करण्यात येणार असून नमुने गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांनी ब्रॅण्डची नावे सांगितली नसली तरी लोकप्रिय ब्रॅण्डमध्ये आयटीसीचे सनफेस्ट येपी, एचयूएलचे नोर, निसिन फूडस्चे टॉप रामेन आणि नेपाळच्या चौधरी समूहाचे वाय वाय आदींचा समावेश आहे.
एफएसएसएआयकडून आपल्या उत्पादनांच्या विक्रीची परवानगी घेतलेल्या इन्स्टंट नूडल्स, मॅक्रोनी आणि पास्ताच्या सर्व ब्रॅण्डची नावे सोमवारी प्राधिकरणाकडून जाहीर केली जाणार आहेत. या ब्रॅण्डचे नमुने चाचणीसाठी गोळा केले जातील.
ज्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या विक्रीची परवानगी घेतली नसेल ती सर्व उत्पादने बेकायदेशीर असून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विचार केला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. एफएसएसएआयची मंजुरी नसलेली अनेक उत्पादने बाजारात विक्रीला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, मॅगीनंतर कर्नाटकने इतर कंपन्यांच्या नूडल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मिझोरम सरकारने राज्यात नेस्ले नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

(वृत्तसंस्था)

Web Title: Now after the Magi, the pasta, the macroeo the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.