गोलाणीतील ओटे मोकळे करण्याचे काम आजपासून
By Admin | Updated: March 15, 2016 00:33 IST2016-03-15T00:33:40+5:302016-03-15T00:33:40+5:30
सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र सध्या या ठिकाणी काही हॉकर्स व्यवसाय करीत आहेत. मनपाच्या रेकॉर्डनुसार २००८ मध्येच या ओट्यांची मुदत संपली आहे. मात्र गोलाणीतील ९० हॉकर्सनी सोमवारी वकिलांसह येऊन मनपा आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे मनपा आयुक्तांनी तूर्त हे ९० हॉकर्स वगळून उर्वरित जागांवर सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सला या ठिकाणी जागा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी सकाळी या ठिकाणी याद्या नेऊन ९० हॉकर्सची ओळख पटवून उर्वरित ओटे रिक्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

गोलाणीतील ओटे मोकळे करण्याचे काम आजपासून
स भाष चौक रस्त्यावरील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र सध्या या ठिकाणी काही हॉकर्स व्यवसाय करीत आहेत. मनपाच्या रेकॉर्डनुसार २००८ मध्येच या ओट्यांची मुदत संपली आहे. मात्र गोलाणीतील ९० हॉकर्सनी सोमवारी वकिलांसह येऊन मनपा आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे मनपा आयुक्तांनी तूर्त हे ९० हॉकर्स वगळून उर्वरित जागांवर सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सला या ठिकाणी जागा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी सकाळी या ठिकाणी याद्या नेऊन ९० हॉकर्सची ओळख पटवून उर्वरित ओटे रिक्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.