शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

भारताकडून कुख्यात गँगस्टर लखबीर सिंह लांडा दहशतवादी घोषित; हत्या, बॉम्बस्फोटासह २० गंभीर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 1:44 PM

एनआयएच्या विशेष न्यायालयाने यावर्षीच लखबीर सिंह लांडा याची तरणतारण जिल्ह्यात असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. 

नवी दिल्ली : कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या लखबीर सिंह लांडा याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (UAPA) ही कारवाई करत लखबीर सिंह लांडा याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. "मोहाली येथील पंजाब स्टेट इंटेलिजेन्स हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यात लखबीर सिंह लांडा याचा सहभाग होता. तसंच अनेक ठिकाणी वसुली, हत्या, बॉम्बस्फोट, हत्यारांसह अमली पदार्थांच्या तस्करीत तो सक्रिय आहे," अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या लखबीर सिंह लांडा याचा जन्म १९८९ साली पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात झाला होता. लहानपणापासूनच विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लखबीर याने २०१७ साली कॅनडामध्ये पलायन केलं. खलिस्तानवाद्यांशी संबंधित असलेला लखबीर सिंह लांडा याने ९ मे २०२२ मध्ये मोहालीमध्ये रॉकेटच्या मदतीने ग्रेनेड हल्ला केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास पथक त्याच्या शोधात आहे. 

NIAने जाहीर केलं बक्षीस

लखबीर सिंह लांडा याच्या शोधात असलेल्या एनआयएने त्याच्यावर १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. एनआयएच्या माहितीनुसार, सध्या तो कॅनडा येथील अल्बर्टा परिसरात राहात आहे. बब्बर खालसासह भारतविरोधी अनेक संघटनांशी त्याचा संबंध असल्याची माहिती आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने यावर्षीच लखबीर सिंह लांडा याची तरणतारण जिल्ह्यात असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान, लखबीर सिंह लांडा याच्यावर हत्या, वसुली, अमली पदार्थ तस्करी असे २० विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता त्याला दहशतवादी घोषित केल्यानंतर भारताकडून त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी