टेक्सटाईल पार्कची आठवडाभरात अधिसूचना गिरीश महाजन : शेळगाव प्रकल्पासाठी सुधारित मान्यता
By Admin | Updated: October 16, 2016 21:28 IST2016-10-16T21:28:14+5:302016-10-16T21:28:14+5:30
जळगाव : शेतकर्यांसोबत तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जामनेर तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या टेक्सटाईल्स् पार्कची आठवडाभरात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांना एकरकमी निधीसाठी प्रयत्न करीत असताना शेळगाव प्रकल्पासाठी सुधारित मान्यता देण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
