यूपीएससी परीक्षेतील बदलाची अधिसूचना

By Admin | Updated: August 20, 2014 23:22 IST2014-08-20T23:22:45+5:302014-08-20T23:22:45+5:30

हिंदी भाषक पट्टय़ातील उमेदवारांनी आंदोलन केल्यानंतर सी-सॅट परीक्षेतील इंग्रजीचे गुण ग्रेडेशनसाठी ग्राह्य न धरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

Notification for change in UPSC test | यूपीएससी परीक्षेतील बदलाची अधिसूचना

यूपीएससी परीक्षेतील बदलाची अधिसूचना

नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्टय़ातील उमेदवारांनी आंदोलन केल्यानंतर सी-सॅट परीक्षेतील इंग्रजीचे गुण ग्रेडेशनसाठी ग्राह्य न धरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्याची मंगळवारी अधिसूचना काढण्यात आली. 
नागरी सेवा (पूर्व) परीक्षेतील दुस:या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजीचे गुण ग्रेडेशनसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. नागरी सेवा (पूर्व) परीक्षेसाठी प्रत्येकी 2क्क् गुणांचे दोन पेपर देणो आवश्यक आहेत. 
या पेपरला सी-सॅट 1 आणि सी-सॅट 2 असे देखील म्हटले जाते. या परीक्षेत दोन्ही पेपरचे गुण मिळून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मात्र दुस:या पेपरमधील 2क्क् गुणांपैकी इंग्रजीवरील 22.5 गुण वगळण्यात येतील. यावर्षी पूर्व परीक्षा रविवारी होत आहे. 
उमेदवारांनी दुस:या पेपरमधील इंग्रजी सेक्शनमधील 22.5 गुणांचे नऊ प्रश्न सोडवू नये, असे कार्मिक व प्रशिक्षण विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Notification for change in UPSC test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.