काँग्रेसला मुख्यालय रिकामे करण्याबाबत नोटीस

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:26+5:302015-02-20T01:10:26+5:30

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली

Notice to vacate the headquarters of Congress | काँग्रेसला मुख्यालय रिकामे करण्याबाबत नोटीस

काँग्रेसला मुख्यालय रिकामे करण्याबाबत नोटीस

ीन सिन्हा/ नवी दिल्ली
लोकसभापाठोपाठ अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारणार्‍या काँग्रेसवर राजधानी दिल्लीतील आपले पक्ष मुख्यालय रिकामे करण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे़ केंद्र सरकारने काँग्रेसला पक्ष मुख्यालय रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली आहे़ रायसीना मार्गावरील जवाहरलाल भवन तसेच राजीव गांधी ट्रस्टचे कार्यालय रिकामे करण्याचेही नगर विकास मंत्रालयाने बजावलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे़ ही सर्व कार्यालये काँग्रेसला लीजवर दिलेली होती आणि ही लीज २०१३ मध्ये संपल्याचे सांगण्यात येत आहे़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, नवीन जिंदल आदींनी या मुद्यावर चर्चा केली आणि नगर विकास मंत्रालयाकडून आणखी काही काळ मुदत मागण्याचा निर्णय घेतला आहे़ या काळात कायदेशीर उपाययोजनांची शक्यता काँग्रेस तपासणार आहे़
पक्ष मुख्यालयासोबतच काँग्रेसच्या ताब्यात असलेली अन्य काही महत्त्वपूर्ण कार्यालयेही रिकामी करण्याचे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे़ २४, अकबर रोड हे काँग्रेसचे मुख्यालय आहे़ याच ठिकाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कार्यालय आहे़ २६, अकबर रोड हे काँग्रेस सेवादलाचे कार्यालय आहे़ ६, रायसीना रोडस्थित युवा काँग्रेसचे कार्यालय आहे तर ५, रायसीना हे राजीव गांधी ट्रस्टचे जवाहरलाल भवन कार्यालय म्हणून ओळखले जाते़ चाणक्यपुरीमधील सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेला एक बंगला रिकामा करण्याबाबतही नोटीस बजावण्यात आली आहे़
काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार,निवडणुकीत पराभवानंतर राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेसला अशा प्रकारची नोटीस मिळाली आहे़२४ आणि २६ अकबर मार्गावरील काँग्रेसच्या ताब्यातील कार्यालयाबाहेर करण्यात आलेले अवैध आणि अतिरिक्त बांधकाम त्वरित हटविण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहे़

Web Title: Notice to vacate the headquarters of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.