दिल्लीत पोस्टरवॉर, बेदींकडून केजरीवालांना नोटीस
By Admin | Updated: January 27, 2015 21:19 IST2015-01-27T16:55:12+5:302015-01-27T21:19:45+5:30
रिक्षांवर झळकलेल्या एका पोस्टरमुळे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी भडकल्या असून त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.

दिल्लीत पोस्टरवॉर, बेदींकडून केजरीवालांना नोटीस
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्ली निवडणुकीची अंतिम तारीख जवळ येत असून प्रचाराचा रणधुमाळी उडालेली असतानाच दिल्लीत पोस्टर वॉरही रंगले आहे. रिक्षांवर झळकलेल्या एका पोस्टरमुळे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी भडकल्या असून त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.
'दिल्लीचा मुख्यमंत्री कैसा हो ' असा प्रश्न विचारणारे एक पोस्टर सध्या दिल्लीतील रिक्षांवर झळकत असून केजरीवाल यांच्या नावाखाली 'इमानदार' आणि बेदी यांच्या नावाखाली 'अवसरवादी' असे लिहीले आहे. आपचे हे पोस्टर बेदींना चांगलेच झोंबले असून आपली परवानगी न घेता आपला फोटो या पोस्टवर वापरल्याबद्दल बेदी यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी केजरीवाल यांना नोटीस पाठवत हा फोटो तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास आपण कायदेशीर कारवाई करू असा इशाराही देण्यात आला आहे.