नगराध्यक्ष मास्कारेन्हस विरुध्द अविश्वास ठरावाची नोटीस

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

कुंकळ्ळी : कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लॅन्ड्री मास्कारेन्हस यांच्याविरुध्द सहा नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली असुन नगराध्यक्ष विकास कामात नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप अविश्वास ठरावाच्या नोटीसीत केला आहे.

Notice of No Objection Resolution Against City President Mascarenhas | नगराध्यक्ष मास्कारेन्हस विरुध्द अविश्वास ठरावाची नोटीस

नगराध्यक्ष मास्कारेन्हस विरुध्द अविश्वास ठरावाची नोटीस

ंकळ्ळी : कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लॅन्ड्री मास्कारेन्हस यांच्याविरुध्द सहा नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली असुन नगराध्यक्ष विकास कामात नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप अविश्वास ठरावाच्या नोटीसीत केला आहे.
उपनगराध्यक्ष प्रेमदीप देसाई, नगरसेविका पोलिटा कॉर्नेरो, नागेश चितारी, क्रोसी फर्नाडिस, मंगलदास गावकर व माजी नगराध्यक्ष देेवेंद्र देसाई यांनी अविश्वास ठरावाच्या नोटीसेवर सह्या केल्या आहेत. मास्कारेन्हस यांनी भाजपाशी हात मिळवणी करुन भाजपाच्या समर्थनावर नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळवली होती.
मास्कारेन्हस यांना केवळ सहा महिन्यासाठी नगराध्यक्षपदावर बसविले होते. नोव्हेंबल २0१४ त खुर्ची खाली करुन नगराध्यक्षपद भाजपाचे नगरसेवक नागेश चितारी यांना देण्याचे सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी कबुल केले होते. मात्र नगराध्यक्ष मास्कारेन्हस यांनी खुर्ची खाली न करता दोन फेब्रुवारीपयंत मुदत वाढवून घेतली होती. मुदत वाढवून दिल्यानंतरही नगराध्यक्षपद सोडत नाही म्हणून भाजप नगरसेवक व भाजप समर्थक संतप्त बनले होते. भाजपा नगरसेवकांनी अखेर माजी नगराध्यक्ष देवेंद्र देसाई यांच्या मदतीने मास्कारेन्हस यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना खुर्चीवरुन खाली खेचण्याची तयारी केली आहे. अविश्वास ठरावावार सह्या केलेल्या सहा नगरसेवकांच्या अतिरिक्त आणखी दोन नगरसेवकांच्या नागेश चितारी यांना पाठिंबा असून मास्कारेन्हस यांच्याबरोबर केवळ एकच नगरसेवक असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Notice of No Objection Resolution Against City President Mascarenhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.