कर्नाटक पोलिसांना नोटीस
By Admin | Updated: December 13, 2014 01:48 IST2014-12-13T01:48:40+5:302014-12-13T01:48:40+5:30
येळ्ळूर गावच्या वेशीवरचा महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर मराठी भाषिकांना केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी केंद्रीय मानवाधिकार आयोगाने कर्नाटक पोलिसांना नोटीस बजावली आहे.

कर्नाटक पोलिसांना नोटीस
बेळगाव : येळ्ळूर गावच्या वेशीवरचा महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर मराठी भाषिकांना केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी केंद्रीय मानवाधिकार आयोगाने कर्नाटक पोलिसांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.
येळ्ळूर गावच्या वेशीवरील महाराष्ट्र राज्य नावाचा फलक 26 मे रोजी हटविल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात एकीकरण समितीने केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)
चौकशीसाठी समिती येणार
या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी केंद्रीय आयोगाची समिती लवकरच कर्नाटकमधील येळ्ळूरमधील गावाचा दौरा करणार आहे. याचबरोबर 53 नागरिकांना व विनोद तावडे यांना नोटिशीद्वारे चौकशीसंबंधी येत असल्याचे कळविण्यात आले आहे.