मनपास कारणेदाखवा नोटीस

By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:11+5:302016-02-08T22:55:11+5:30

जळगाव : महापालिकेने विसनजीनगर इंडोअमेरिकन नजकीच्या गल्लीत हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात रहिवाशांनी न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने याप्रश्नी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावत याप्रश्नी १० रोजी खुलासा सादर करण्याचे आदेश केले आहेत.

Notice for Causes | मनपास कारणेदाखवा नोटीस

मनपास कारणेदाखवा नोटीस

गाव : महापालिकेने विसनजीनगर इंडोअमेरिकन नजकीच्या गल्लीत हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात रहिवाशांनी न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने याप्रश्नी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावत याप्रश्नी १० रोजी खुलासा सादर करण्याचे आदेश केले आहेत.
चित्र चौक ते शिवाजी पुतळ्यापासूनच्या हॉकर्सला विसनजी नगरातील सीटी सर्व्हे नंबर १९८२ मधील ठिकाणी जागा देण्यात आली आहे. महापालिकेने या ठिकाणी आखणी केली त्यावेळी नागरिकांनी विरोध दर्शवत हरकत दाखल केली होती. मात्र महापालिकेने ती नामंजूर केली. या विरुद्ध नागरिकांनंी महापालिकेच्या निर्णया विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. द स्ट्रीट वेंडरच्या कायद्यातील तरतुदीचे पालन न करता बेकायदेशिररीत्या आखणी केली त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे येथे हॉकर्सला जागा देण्याच्या निर्णयास मनाई करण्यात यावी अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने महापालिकेस नोटीस बजावून आपल्या कृतीस मनाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश केले. याप्रकरणी पुढील कामकाज १० रोजी होईल. वादीतर्फे न्यायालयात ॲड. के.बी. वर्मा, ॲड. जयेश भावसार यांनी काम पाहिले.

Web Title: Notice for Causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.