शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बीबीसीला केंद्राची नोटीस

By admin | Updated: March 6, 2015 09:16 IST

वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचे प्रसारण न करण्याच्या भारत सरकारच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून बीबीसीने बुधवारी रात्री १० वाजता ही डॉक्युमेंट्री ब्रिटनमध्ये प्रसारित केली.

ब्रिटनमध्ये प्रसारण : भारताचा सल्ला धुडकावलानवी दिल्ली : दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडावर तयार करण्यात आलेल्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचे प्रसारण न करण्याच्या भारत सरकारच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून बीबीसीने बुधवारी रात्री १० वाजता ही डॉक्युमेंट्री ब्रिटनमध्ये प्रसारित केली. त्यामुळे संतप्त झालेल्या केंद्र सरकारने आता बीबीसीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, ही डॉक्युमेंट्री भारतात दाखविण्याची आपली योजना नाही, असे बीबीसीने केंद्रीय गृहमंत्रालयाला कळविले आहे. दरम्यान, भारत सरकारने ही डॉक्युमेंट्री प्रसारित केल्याबद्दल बीबीसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही डॉक्युमेंट्री दुपारपर्यंत ‘यू ट्यूब’वर उपलब्ध होती; परंतु माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितल्यावरून दुपारनंतर ‘यू ट्यूब’ने ही डॉक्युमेंट्री काढून टाकली.‘डॉक्युमेंट्रीचा व्यावसायिक हेतूसाठी वापर केला जाणार नाही, या करारात असलेल्या अटीचा भंग करण्यात आला आहे आणि त्याबद्दल ही ब्रिटिश मीडिया संस्था कायदेशीर कारवाईस पात्र ठरत आहे,’ असे या नोटिशीत म्हटले आहे. ‘बीबीसीतर्फे डॉक्युमेंट्रीचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही बीबीसीवर बुधवारी सायंकाळी कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे,’ असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.‘या डॉक्युमेंट्रीचे प्रसारण करू नका, असे आम्ही बीबीसीसह अन्य सर्वच चॅनल्सना सांगितलेले होते. आता बीबीसीविरुद्ध जी काही कारवाई करायची आहे, ती गृृहमंत्रालय करील. नियमांचा भंग झाला असेल तर उचित कारवाई केली जाईल. मी माहिती व प्रसारण मंत्रालयाशी बोललो आहे आणि विदेश मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे,’ असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी म्हटले आहे.पिता कोर्टात खेचणारबल्लिया : बीबीसीने तयार केलेल्या या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणाला ‘निर्भया’च्या पालकांनी प्रखर विरोध केला आहे. यात आपल्या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यावर तीव्र हरकत घेऊन या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही ‘निर्भया’च्या पित्याने दिला.‘माझ्या मुलीचे नाव व छायाचित्र सार्वजनिक करू नका असे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही त्यांनी तसे केले. हे योग्य नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू,’ असे ‘निर्भया’च्या पित्याने म्हटले आहे. भारतात प्रसारण नाही-बीबीसीही वादग्रस्त डॉक्युमेंट्री भारतात दाखविण्याची कोणतीही योजना नाही, असे बीबीसीने जाहीर केले आहे. भारत सरकारच्या निर्देशांचे पालन करीत या डॉक्युमेंट्रीचे प्रसारण भारतात केले जाणार नाही, असे बीबीसीने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे. ब्रिटिश चित्रपट निर्माती लेस्ली उडविन यांच्याविरुद्ध अनुमतीच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपात कारवाई करण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चित्रीकरणाची अनुमती देणाऱ्या नियमांची समीक्षा केली जाईल, असे राजनाथसिंग यांनी म्हटले होते.‘सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही सर्व तथ्य तपासून पाहत आहोत.’-राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री