शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हनीप्रीत, आदित्य इन्सानविरुद्ध नोटीस, पोलिसांचे सावधगिरीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:01 IST

तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याने दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इन्सान आणि डेराचा मुख्य कारभारी आदित्य इन्सान यांच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची (लूक आऊट) नोटीस हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी दिली

चंदीगढ : तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याने दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इन्सान आणि डेराचा मुख्य कारभारी आदित्य इन्सान यांच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची (लूक आऊट) नोटीस हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी दिली. पंचकुलाचे पोलीस आयुक्त ए. एस. चावला यांनी ही माहिती दिली. हनीप्रीत हिच्यावर कोणते आरोप आहेत हे समजले नसले, तरी आदित्य इन्सान याच्यावर देशद्रोहाचे आरोप आधीच दाखल आहेत.राम रहीम याला २५ आॅगस्ट रोजी न्यायालयाने दोषी ठरविल्यावर त्याची सुटका करण्याचा कट करण्यात आल्याच्या आरोपांचीही चौकशी आम्ही करीत आहोत, असे तेम्हणाले. ही नोटीस बजावल्यानंतर देशातील विमानतळे, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. २००२ मध्ये झालेल्या बलात्काराच्या खटल्यात राम रहीम याला तुरुंगवासाची शिक्षा सुनाविली गेलेली आहे. डेराचे दोन मुख्य कारभारी आदित्य इन्सान व धीमन इन्सान यांच्याविरोधात वृत्तपत्राच्या बातमीदाराने केलेल्या निवेदनानंतर पंचकुला पोलीस ठाण्यात यापूर्वीच दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. धीमन याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. तुरुंगात वेगळे ठेवलेनवी दिल्ली : राम रहीम याला इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेले आहे. राम रहीम याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर, त्याच्या पाठीराख्यांनी जो हिंसाचार केला, त्यामुळे तुरुंगातील कैदी संतापलेले आहेत. माहिती राम रहीम याच्यासोबत एकाच खोलीत असलेल्या व शुक्रवारी जामिनावर सुटलेल्या कैद्याने दिली आहे. बाबाच्या पाठीराख्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे कैदी संतापलेले आहेत.राम रहीम याला वेगळे ठेवले गेले नसते, तर कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता, असे तो कैदी म्हणाला. तो राम रहीमबरोबर सोनारिया (तुरुंगात पाच दिवस एकत्र होता.राम रहीमचे फोटोे नाल्यांतजयपूर : राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरातील तुंबलेल्या काही नाल्यांची पाहणी केली असता, त्यात राम रहीम याचे शेकडो फोटो आढळले. मीरा चौक आणि सुखाडिया सर्कलमधील नाले या फोटोंमुळे तुंबले होते. त्यात १०० पेक्षा जास्त फोटो व राम रहीमची भित्तिपत्रके टाकून दिली होती. हे फोटो आणि भित्तिपत्रके बाबाच्या अनुयायांनी टाकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमCrimeगुन्हाCourtन्यायालयPoliceपोलिस