ठाण्यात २४४६ धोकादायक इमारतींना पालिकेच्या पुन्हा नोटिसा

By Admin | Updated: August 6, 2015 22:08 IST2015-08-06T22:08:39+5:302015-08-06T22:08:39+5:30

ठाणे : कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील २ हजार ४४६ धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा पाठविल्या आहेत.

Notice to the 2446 dangerous buildings in the police station again | ठाण्यात २४४६ धोकादायक इमारतींना पालिकेच्या पुन्हा नोटिसा

ठाण्यात २४४६ धोकादायक इमारतींना पालिकेच्या पुन्हा नोटिसा

णे : कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील २ हजार ४४६ धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा पाठविल्या आहेत.
कृष्ण निवास इमारतीच्या जवळ असलेली कमलाजी भवन ही इमारत दोन महिन्यांपूर्वीच पालिकेने पाडण्यास सुरुवात केली होती. तर कृष्ण निवासच्या मागे असलेल्या गणेश दर्शन या इमारतीला पालिकेने नोटीस बजावल्याने या इमारतीत वास्तव्य करणारी ३१ कुटुंबे धास्तावली आहेत. या इमारत दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, या धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. कळव्यातील सोनूबाई टॉवर, नौपाड्यातील यशवंत कुंज आणि आजी कृपा तसेच मुंब्य्रातील दोन इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. या इमारतीतील रहिवाशांना संक्र मण शिबिरात हलविले जाणार असले तरी या कारवाईला रहिवाशांचा विरोध आहे.
..................
वाचली - नारायण जाधव

Web Title: Notice to the 2446 dangerous buildings in the police station again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.