शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

"सोपं काहीच नव्हतं, पण मी प्रत्येक प्रसंगाशी भिडले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:07 IST

"...त्याक्षणी मला जाणवलं, की माझं स्वप्न काय आहे. मला पायलट व्हायचं आहे आणि आकाशावर नाव कोरायचं आहे."

माझा संपूर्ण प्रवास खूपच जबरदस्त, विलक्षण आणि उत्साहवर्धक ठरला. मला अजूनही ती गोष्ट आठवते, जेव्हा मी सहावीत होते. एकदा आमच्या वर्गात ‘नावांचा अर्थ’ यावर चर्चा चालू होती. माझं नाव आहे ‘व्योमिका’. ‘व्योम’ म्हणजे आकाश. मी ते सर्वांना सांगितलं. तेव्हा वर्गात कुणीतरी मागून मोठ्याने म्हटलं, ‘म्हणजे तू तर आकाशाची मालकीण झालीस!’ आणि त्यावर माझ्या शिक्षिकांनीही हसून उत्तर दिलं, ‘हो, असं वाटतं, की हीच त्या आकाशावर राज्य करणार आहे.’ त्याक्षणी मला जाणवलं, की माझं स्वप्न काय आहे. मला पायलट व्हायचं आहे आणि आकाशावर नाव कोरायचं आहे.

सहावीतील क्षणाने माझ्या मनात स्वप्नाचं बीज रोवलं. मी ते स्वप्न मनात घट्ट धरून ठेवलं आणि तेव्हापासून ठरवलं, मी पायलटच होणार. पण हे स्वप्न सहज नव्हतं. १९९१-९२ चा काळ. तेव्हा महिलांना वायुसेनेत पायलट म्हणून संधी दिली जात नव्हती. मला तेवढंच माहीत होतं. शालेय जीवनात मी नियमितपणे ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मधील सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती वाचायची. एक जाहिरात अजूनही लक्षात आहे. त्यातील संधी ही केवळ अविवाहित पुरुष उमेदवारांसाठीच होती. ते वाचून मी खूप निराश झाले. वाटलं, हे स्वप्न आपल्यासाठी नाहीच काय? पण हार मानली नाही. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी मला समजलं की यूपीएससीच्या माध्यमातूनही पायलट होण्याची संधी आहे. मग मी एसएसबीसाठी अर्ज केला. अखेर तो स्वप्नवत क्षण आला. मी एक हेलिकॉप्टर पायलट झाले. त्या दिवसापासून मागे वळून पाहिलंच नाही. हेलिकॉप्टर पायलट म्हणून माझा प्रवास थरारक राहिला. अनेक भूमिका पार पाडाव्या लागल्या. समुद्रसपाटीपासून ते १८ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण केलं. अनेक वेळा रुग्णवाहतूक मोहिमा राबविल्या. हवामानाच्या अडथळ्यांची अनेक आव्हानं होतीच. पण मी प्रत्येक प्रसंगाशी भिडले. आज अभिमानाने सांगते की, हे सगळं मला मनापासून आवडलं.

आत्मविश्वास अन् बिनधास्तपणाफक्त पुस्तकी किडा व्हायचं नाही; तर सर्व काही शिकायचं. ७० टक्के अभ्यासावर भर देऊन, उरलेली वेळ इतर कौशल्यांसाठी द्यायची. शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. मुलांपेक्षा स्वतःला कधीच कमी समजले नाही. वर्तन आणि व्यवहारही तसाच होता. पायऱ्या चढताना मुलांप्रमाणे शिट्टी वाजवायची. आई म्हणाली, बेटा हे ठीक नाही. तू मुलगी आहेस. मम्मी मुलगी-मुलगा असं काही नसतं. शिट्टी वाजवायचं लायसन्स काय फक्त मुलांकडेच आहे का?  (संकलन : महेश घोराळे)

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूर