ँपान - कुडचडे पालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30
कुडचडे : कुडचडे पालिकेकडून काही आठवड्यांपूर्वी थकित घरप?ी भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत निम्म्या भागात नोटिसा पाठविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 840 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेमधून मिळाली आहे. 46 लाखांच्या दरम्यान घरप?ी थकबाकी पालिकेकडे शिल्लक आहे. त्यामुळे पालिका मुख्याधिकार्यांनी थकबाकीविरोधात आक्रमक पवित्रा घेत कारवाईचे संकेत दिले.

ँपान - कुडचडे पालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा
क डचडे : कुडचडे पालिकेकडून काही आठवड्यांपूर्वी थकित घरप?ी भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत निम्म्या भागात नोटिसा पाठविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 840 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेमधून मिळाली आहे. 46 लाखांच्या दरम्यान घरप?ी थकबाकी पालिकेकडे शिल्लक आहे. त्यामुळे पालिका मुख्याधिकार्यांनी थकबाकीविरोधात आक्रमक पवित्रा घेत कारवाईचे संकेत दिले.कुडचडे पालिकेकडून वॉर्ड क्र. 7 ते 12 पर्यंत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 840 जणांना नोटिसा आजपर्यंत पाठविण्यात आल्या असून अजून 140 जणांना काही तांत्रिक अडचणीमुळे नोटिसा पाठविण्याचे काम बाकी आहे. पालिकेच्या कामाचा ताण कर्मचार्यांवर जास्त पडल्याने दुपारी 3 वाजल्यानंतर नोटिसा पाठविण्याचे काम सुरू होते. सध्या पालिका क्षेत्रामध्ये पूर्वीची घरे ही अस्तित्वात नाहीत. तसेच काही घरे ही मोडलेली आहेत. त्याठिकाणी कोणीही राहत नाही. घरमालक परराज्यात किंवा परदेशात असल्याच्या कारणाने घरमालक सापडत नाहीत. तसेच काही घरांची नोंदणी दोनवेळा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)