शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
2
Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
4
'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला
5
"राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी 
6
IND vs ENG : नायर ऑन फायर! इंग्लंडमधील द्विशतकी खेळीसह पठ्ठ्यानं किंग कोहलीच्या जागेवर टाकला 'रुमाल'
7
बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...
8
३४ षटकांनंतर नवा चेंडू, ५ बॅकअप खेळाडू, क्रिकेटमधील हे नियम आता बदलणार, ICCने दिली मान्यता
9
तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली
10
गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले
11
कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
12
Mumbai: भयानक! लैंगिक संबंधांना नकार दिल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चेंबूर येथील घटना
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
मोमोज आवडीने खाताय, तर मग तुम्हीच स्वत:चा जीव धोक्यात टाकताय, होतील 'हे' गंभीर आजार
15
'यापुढे दरवाजा बंद राहील हे लक्षात असू द्या', ...त्या व्हिडीओवरून ट्रम्प यांचा मॅक्राँ यांना मोलाचा सल्ला  
16
एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ
17
एका शेअरवर ३ बोनस शेअर्स देणार कंपनी, रेकॉर्ड डेटचीही घोषणा; तुमच्याकडे आहे का?
18
उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत
19
Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा
20
धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा- श्रीकांत शिंदे

"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:03 IST

पाकिस्तानवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "पाकिस्तानात सर्वच  दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण...

आपल्या विधानांमुळे सातत्याने वादात राहणाऱ्या भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आता पुन्हा एकदा असेच एक  विधान केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली. या ऑपरेशनसंदर्भात प्रज्ञा ठाकूर यांनी हे विधान केले आहे. "दहशतवाद्यांनी नव्हे, तर पाकिस्तानातून मुस्लीम लोक आले आणि त्यांनी नाव आणि धर्म विचारून हिंंदुंना मारले."

एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "मुस्लिमांनी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. यामुळे ऑपरेशन सिंदूर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात "सिंदूर" (कुंकू) हे सौभाग्याचे  प्रतिक मानले जाते. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी पहलगाममध्ये महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले. यामुळेच याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आल. पाकिस्तान आणि मुस्लिमांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत."

प्रज्ञा ठाकूर पुढे म्हणाल्या, "ही एक अतिशय भयावह आणि हृदयद्रावक घटना आहे. ज्यांनी या हत्या केल्या भारत त्यांना सोडणार नाही. हे लोक जेथे पाळले-पोसले जातात, त्या देशालाही भारत सोडणार नाही."

"पाकिस्तानात सर्वच दहशतवादी" - पाकिस्तानवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "पाकिस्तानात सर्वच  दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण ते मुस्लिम म्हणून भारतात आले आणि हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यांनी मुस्लिमांना मारले नाही. ते ठरवून आले होते. जर कुणी मुस्लीम आहे, असं खोटं सांगितलं, तर त्यांना कलमा म्हणायला सांगितलं आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना मारलं."

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर