शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धक्कादायक! नोटाबंदीत पेट्रोल पंपावर वापरलेल्या जुन्या नोटांची आकडेवारीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 06:51 IST

आरबीआयचे स्पष्टीकरण; आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात पेट्रोल पंप, रेल्वे तिकिट आणि वीज, पाणी आदींच्या बिलांचे पेमेंट करण्यासाठी लोकांकडून देण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांची आकडेवारी नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.आरबीआयने माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, लोकांना सूट म्हणून सरकारने २३ सेवांसाठी बिलांचे पेमेंट करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली होती. या सेवांमध्ये सरकारी हॉस्पिटल, रेल्वे, सार्वजनिक परिवहन, विमानतळावरील तिकीट, दुध केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल पंप, मेट्रो तिकीट, डॉक्टरच्या चिठ्ठीवर सरकारी आणि खासगी फार्मसीतून औषधी खरेदी करणे, एलपीजी गॅस सिलिंडर, रेल्वेतील खाद्यपदार्थ, वीज व पाण्याचे बिल, एएसआय स्मारकांचे प्रवेश तिकीट आणि टोल नाक्यावरील शुल्क आदींचा यात समावेश होता.सरकारने नोटाबंदीनंतर या सेवांसाठी केवळ ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकार करण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी १५ डिसेंबर २०१६ पर्यंत होती. सरकारने २ डिसेंबर २०१६ रोजी पेट्रोल पंप आणि विमानतळावर तिकीट खरेदी करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्यावरही प्रतिबंध आणले होते. आरबीआयने म्हटले की, बिलांपोटी जी रक्कम भरण्यात आली त्याची माहिती उपलब्ध नाही. आरबीआयने मागीलवर्षी आॅगस्टमध्ये सांगितले होते की, ५०० आणि १००० रुपयांच्या ९९.३ टक्के नोटा बँकींग प्रणालीत परत आल्या आहेत. नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि १००० रुपयांच्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. यातील १५.३१ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकात परत आल्या. बदलण्यात आलेल्या जुन्या नोटांची संख्या आणि मूल्य याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने २८ नोव्हेंबर २०१६ रोजी दिलेल्या निवेदनाचा हवाला दिला आहे.किती कोटी रक्कम जमा झाली?१० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये ८,४४,९८२ कोटी रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत किंवा बदलण्यात आल्या आहेत. यातील ३३,९४८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्या होत्या आणि ८,११,०३३ कोटी रुपये जमा करण्यात आले.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणPetrol Pumpपेट्रोल पंपReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक