शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पुस्तकी ज्ञान नको, शिक्षण क्षेत्रात भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे: बिल गेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:50 IST

मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.भारतातील शिक्षण क्षेत्रावर सावध टीका करताना बिल गेट्स म्हणाले, भारताविषयीचे माझे मत तसे सकारात्मक असले तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत मात्र मी फार निराश आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिक चांगली असायला पाहिजे. मला त्यावर टीका करायची नाही. परंतु मला त्याबाबत ब-याच चांगल्या अपेक्षा आहेत.’तथापि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आपल्या तूर्तास कोणत्याही योजना नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याकडे वळणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आपण सर्वच काही करू शकत नाही. भारतातील बहुतांश समाजसेवकांनी शिक्षण क्षेत्र निवडले आहे आणि त्याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले.केवळ पुस्तकी ज्ञान बाळगण्याची प्रवृत्ती चांगली नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मागील दोन दशकात भारताने मोठी भरारी घेतली आहे. विकासाचे चांगले संकेत मिळत आहेत. परंतु या उपलब्धीचा योग्य फायदा करण्याची आणि आपल्या मानव विकास निर्देशांकाचा परिपूर्ण वापर करण्याची गरज आहे. हे सर्व काही केवळ दर्जेदार शिक्षणामुळे घडेल आणि भारताच्या विकासाचा चढता आलेख कायम राखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.’बालकांना त्यांच्या लहान वयात केवळ चांगले आरोग्य आणि पोषणहार देणेच गरजेचे नाही तर त्यांना चांगले शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे. शिक्षणामुळे मोठे झाल्यावर त्यांची कमावण्याची क्षमताही वाढेल. या संदर्भात बरेच काही करण्याची गरज आहे. परंतु या क्षेत्रात भारताला अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा आहे, असे बिल गेट्स म्हणाले.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसeducationशैक्षणिकIndiaभारत