अहवालात गोमांसचा उल्लेखच नाही

By Admin | Updated: October 7, 2015 03:14 IST2015-10-07T03:14:27+5:302015-10-07T03:14:27+5:30

उत्तर प्रदेशातील दादरी येथे जमावाने केलेल्या मारहाणीत ठार झालेल्या मोहंमद इकलाखने गोमांस भक्षण केले किंवा नाही याबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळत उत्तर प्रदेश

Not to mention beef in the report | अहवालात गोमांसचा उल्लेखच नाही

अहवालात गोमांसचा उल्लेखच नाही

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दादरी येथे जमावाने केलेल्या मारहाणीत ठार झालेल्या मोहंमद इकलाखने गोमांस भक्षण केले किंवा नाही याबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळत उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे.
इकलाखने गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमाव त्याच्या घरावर चालून गेला होता. त्याच्यासह त्याचा मुलगा दानिश यालाही बेदम मारहाण केली होती. उत्तर प्रदेशने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या अहवालात इकलाखने कत्तलीसाठी प्रतिबंध असलेल्या प्राण्याचे मांस खाल्ल्याबाबत पसरलेल्या अफवेचा उल्लेख केला; मात्र ते ‘गोमांस’ होते किंवा नाही, ते नमूद केलेले नाही.
इकलाखच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करताना पोलिसांनी छळवणूक केल्यामुळेच २४ वर्षीय जयप्रकाश याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केल्यामुळे तणाव पसरला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Not to mention beef in the report