शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीवरून शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 07:01 IST

राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली.

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर २२ विरोधी पक्षांची महाआघाडी नसेल, हे आता स्पष्ट होत चालले आहे. विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या राज्यांत ना संयुक्त सभा होतील ना ते एकत्रितपणे प्रचार करतील हेही स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या संयुक्त सभा टाळणे हे योग्य ठरेल, असे सुचवले आहे. विरोधी पक्षांनी राज्यांत व मतदारसंघांत आपापल्या उमेदवारांचा विजय निश्चित होण्यावर लक्ष केंद्रित करावे. संयुक्त सभा राज्य पातळीवर गरज असेल तरच घेतल्या जाव्यात, असे पवार म्हणाले.

राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली. नुकत्याच एका भेटीत पवारांना महाआघाडीऐवजी फक्त राज्यांतच आघाड्या कराव्यात, असे जाणवले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने युती करण्याचे तत्वत: ठरवले आहे. तसेच इतर राज्यांतही आघाड्या करण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसने तमिळनाडू, बिहार, झारखंड, आंध्र, काश्मीरमध्ये तत्वत: आघाडी केली आहे. परंतु, उत्तर प्रदेशात सपा-बसपाशी आघाडी झालेली नाही.

काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढावे की ममता बॅनर्जी यांच्यासोबत जावे की माकपसोबत हा तिढा सोडवायचा आहे. गुजरात तसेच कर्नाटकातील प्रश्नही त्याच्यासमोर आहे. कर्नाटकात तर काँग्रेसने जनता दलासोबत (धर्मनिरपेक्ष) सरकारही स्थापन केले आहे. याशिवाय हा पक्ष दिल्ली, पंजाब आदी राज्यांत आम आदमी पक्षासोबत आघाडी, जागावाटप आदी प्रश्नांना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रव्यापी संयुक्त सभा नकोत व अशा संयुक्त प्रचार फक्त राज्यांतच मर्यादित ठेवाव्यात, असे सुचवले आहे. शरद पवार यावर भाष्य करण्यास लगेच उपलब्ध झाले नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही लाभ घेण्याची वेळ असून त्या दिशेने चर्चा झालेली आहे, असे सांगितले. मात्र तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.पवारांनी काय दिला सल्ला?ही लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध इतर सगळे’ अशी बनवणे भाजपाला आवडेल तसेच विरोधकांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत अशी स्वत:ची प्रतिमा भाजपा रंगवेल हे शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले आहे. मोदी यांना पदावरून दूर करण्यासाठी नुकतेच २२ विरोधी पक्ष नेते एकत्र आले होते. पण तो प्रयोग सध्या टाळावा. दोन पोटनिवडणुका आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा दुबळेपणाच सिद्ध झाला आहे, असे पवार यांचे मत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार