भारत देशाने पुन्हा एकदा शत्रूच्या गोटात शिरून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. ७ मे २०२५च्या रात्री पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, कोटली, मुजफ्फरबाद आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्लाबोल केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफच्या ९ ठिकाणांवर हल्ला करत, ही तळं उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानी नागरिक, सैन्य किंवा इतर कोणत्याही सामान्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नसल्याचे, सरकारने स्पष्ट केले आहे.
'ऑपरेशन सिंदूर' करत भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला अशाप्रकारे धडा शिकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अशा मोठ्या कारवाया पार पडल्या आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
ऑपरेशन मेघदूत१३ एप्रिल १९८४ला भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन मेघदूत'ची सुरुवात केली होती. जगातील सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण स्थापित करणे होता, हा या ऑपरेशनचा उद्देश होता.
ऑपरेशन विजय कारगिल प्रदेश शत्रूच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारतीय सैन्याने २६ मे १९९९मध्ये 'ऑपरेशन विजय' आखलं होतं. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तब्बल २ महिने युद्ध सुरू होतं.१४ जुलै १९९९ रोजी भारताने हे युद्ध जिंकून 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून कारगिलवर तिरंगा फडकावला.
ऑपरेशन पराक्रम २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ल्या झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने डिसेंबरमध्ये 'ऑपरेशन पराक्रम' सुरू केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले नसले, तरी भारत-पाकिस्तान सीमेवर हजारो सैनिक तैनात होते.
बालाकोट एअर स्ट्राईक१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. या ऑपरेशनमध्ये भारताने बालाकोटमध्ये शिरून हवाई हल्ला केला होता.
सर्जिकल स्ट्राईककाश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर २८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं नष्ट करणे, हा या कारवाईचा उद्देश होता.