शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 08:00 IST

महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बुधवारी जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. परंतु, लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात त्यांनी बंधू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.

महिला आरक्षणाच्या मुद्यावर भाजपकडून एका महिलेने सुरुवात करण्याऐवजी निशिकांत दुबे यांना संधी दिली गेली त्याबद्दल काँग्रेसकडून जेव्हा शेरेबाजी झाली तेव्हा गृहमंत्री अमित शाह म्हणाले, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावे असे नाही,  पुरुषही बोलू शकतातच. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. या वाक्याचा संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना टोला लगावला. ‘प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचे कल्याण बघतील. प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आज नेमके वेगळे काय झाले?महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या की, हे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते. अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले, मी येथे राज्यघटनेतील १२८ व्या दुरुस्तीबाबत बोलण्यासाठी उभा आहे. असे सांगताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यावर शाह म्हणाले- घाबरू नका.

राहुल गांधी म्हणाले, आमच्या संस्थांमध्ये ओबीसींचा सहभाग काय आहे यावर मी संशोधन केले आहे. दरम्यान, खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यावर राहुल गांधी म्हणाले- घाबरू नका, मी जात जनगणनेबद्दल बोलतोय. कानीमोळी करुणानिधी महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्यावर भाजप खासदारांनी गदारोळ सुरू केला, तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांची साथ मिळाली. दोघींनीही मग उभे राहून खासदारांच्या या कृतीचा निषेध केला. वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आंध्र प्रदेशातील काकीनाडा मतदारसंघातील खासदार गीता विश्वनाथ गंगा यांनी ‘भारत माता की जय’चा नारा देत पारंपरिक पद्धतीने सर्वांना अभिवादन केले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार