शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:22 IST

दोन महिन्यांपासून फरपट : लोकांच्या मदतीवर काढले दिवस. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही.

अलीगढ (उत्तर प्रदेश) : कोरोना महामारीचा फार मोठा तडाखा रोजंदारी मजूर लोकांना बसला. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांची उपासमार झाली. सरकारने केलेल्या मदती मर्यादा आहेत. अलीगढ येथील महिला (४२) आणि तिची पाच मुले दोन महिन्यांपासून उपाशी असल्यामुळे त्यांना मलखान सिंह जिल्हा रुग्णालयात भरती करावे लागले आहे. 

या महिलेची मोठी विवाहित मुलगी व तिच्या पतीला हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. लेक व जावयाचीदेखील आर्थिक ओढाताणच आहे. रुग्णालयात भरती केल्यावर त्यांनी एका एनजीओला फोन केल्यावर ती संस्था रुग्णालयातच आली व तिने या कुटुंबाला मदत केली.या सहा जणांना कोणाकडून अधूनमधून जेवण दिले जायचे. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडली. नंतर त्यांना महिलेची मुलगी व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात भरती केले गेले.

या महिलेचा पती दोन महिन्यांपूर्वी गंभीर आजारामुळे मरण पावला. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची खाण्याची आबाळ होत आहे. घर चालवण्यासाठी तिने एका कारखान्यात चार हजार रुपये वेतनाची नोकरीही सुरू केली. लाॅकडनमध्ये कारखाना बंद पडल्यावर तिला कुठेच काम मिळाले नाही. घरातील धान्यही संपले. मग या कुटुंबाला लोकांनी दिलेल्या अन्नावर दिवस काढावे लागले. लॉकडाऊन संपल्यावर या कुटुंबातील मुलाने (२०) मजुरी सुरू केली. ज्या दिवशी काम त्या दिवशी रेशन मिळत होते. काम नसले की कुटुंबाची उपासमार व्हायची. महिलेला चार मुले आणि मुलगी आहे, मुलगी १३ वर्षांची, मोठा मुलगा २०, दुसरा १५, तिसरा १० आणि सर्वात लहान मुलगा पाच वर्षांचा आहे.

तिघांची प्रकृती चिंताजनकमलखानसिंग जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. अमित म्हणाले की, “महिला आणि तिच्या पाच मुलांनी गेल्या दहा दिवसांपासून काहीही खाल्ले नाही, परिणामी त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठीक नसून तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.” 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक