शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सव्वाशे कोटी जनता पाठीशी असल्यानं पाकिस्तानला घाबरत नाही- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:27 IST

पंतप्रधानांची विरोधकांवर सडकून टीका

कलबुर्गी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचा दौरा करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. सर्व विरोधी पक्ष फक्त आणि फक्त मोदीला हटवण्यासाठी एकत्र आले आहेत. पण मी मात्र दहशतवाद नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले. मी दहशतवाद संपवतो आहे, देशातला भ्रष्टाचार संपुष्टात आणत आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते कलबुर्गीत एका जनसभेला संबोधित करत होते. देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची ताकद माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे मी ना विरोधकांना घाबरत, ना पाकिस्तानला, असं मोदी म्हणाले. जोपर्यंत केंद्रात मोदी असेल, तोपर्यंत चोरांचं दुकान बंदच राहील, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली. यावेळी त्यांनी कलबुर्गीत विविध योजनांचं भूमिपूजनदेखील केलं आणि आयुष्यमान योजनेसोबतच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहीन, असं मोदींनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर शरसंधान साधलं. 'त्यांना भ्रष्टाचार हवा आहे. मात्र मोदी तो होऊ देणार नाही. केंद्रात भक्कम सरकार आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे आता त्यांना कमकुवत सरकार हवं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवरदेखील हल्लाबोल केला. 'तुमच्या राज्यात कमकुवत सरकार आहे. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती पाहा. इथले सत्ताधारी केवळ भ्रष्टाचार करत आहेत. प्रत्येकजण एक दुसऱ्याचे पाय ओढत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटकCorruptionभ्रष्टाचारPakistanपाकिस्तान