दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, "जर भाजप सत्तेवर आला, तर सर्व झोपड्या पाडल्या जातील, जमिनी अब्जाधिशांच्या हवाले केल्या जातील. असे आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहेत. त्यांचे हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकही झोपडपट्टी पडणार नाही आणि एकही योजना बंद होणरा नाही. 'आपदा'चे लोक अफवा पसरवत आहेत. मात्र, लक्षात असू द्या, दिल्लीत एकही झोपडी पडणार नाही. तसेच ज्या लोककल्याणकारी योजना आहेत, त्यांपैकी कुठलीही योजन बंद होणार नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजप हा एकमेव पक्ष आहे जो मध्यमवर्गाचा आदर करतो आणि प्रामाणिक लोकांना बक्षीस देतो. मध्यमवर्गीय म्हणत आहे की हा भारताच्या इतिहासातील सर्वात फ्रेंडली अर्थसंकल्प आहे. पूर्वी, अर्थसंकल्प सादर होणार आहे, हे ऐकताच मध्यमवर्गाची झोप उडत होती आणि ते वर्षभर झोपू शकत नव्हते. मात्र, या अर्थसंकल्पाने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. आता १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावरील आयकर शून्य करण्यात आला आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपये वाचतील.
मध्यमवर्गीयांच्या हजारो रुपयांची बचत होणार -यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, "आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही." तसेच, "मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे.