उत्तरेत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:00+5:302015-01-22T00:07:00+5:30
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेसोबतच अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तरेत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता
न ी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेसोबतच अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.दिल्लीत ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसासोबतच बोचऱ्या वाऱ्यामुळे तापमान सामान्यापेक्षा चार अंश खाली घसरले आहे. दाट धुक्यामुळे बुधवारी दिल्लीला जाणाऱ्या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या तर २० गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. ४० रेल्वे कितीतरी तास विलंबाने धावत आहेत. जम्मू-काश्मिरात लडाखसह अनेक ठिकाणी पारा वर चढला असला तरी दाट काळे ढग दाटून येत असल्यामुळे येत्या तीन दिवसांत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दाट धुक्यांमुळे अपघात वाढले आहेत. या राज्यात फुरसतगंज येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.