शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या हंगामामध्ये वायव्य भारतात सर्वाधीक पाऊस पडणार- हवामान विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 15:35 IST

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागासाठी चांगली बातमी

नवी दिल्ली- काल केरळमध्ये मान्सून हजर झाल्यानंतर भारतीय हवामान खात्याने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात सर्वाधीक पाऊस पडेल. तसेच जुलै हा सर्वात जास्त पावसाचा महिना असेल अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहेययाबरोबरच मध्य भारतामध्ये पावसाचा जोर सामान्य (सरासरीइतका) असेल मात्र दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी येथे सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकित हवामान खात्याने केले आहे. तसेच ईशान्य भारतामध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे सांगण्यात आल आहे.टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास वायव्य भारतामध्ये या मान्सून हंगामात एलपीएच्या (लाँग पिरियड अॅवरेज)100 टक्के पाऊस पडेल. तर मध्य भारतामध्ये 99 टक्के, दक्षिण भारतामध्ये 95 टक्के आणि ईशान्य भारतात 93 टक्के इतका पाऊस पडेल.एलपीएच्या 96 ते 104 इतका पाऊस पडल्यास तो सामान्य गृहित धरला जातो. 1951 ते 2000 या काळाचा अभ्यास करुन काढलेला एलपीए 89 सेंमी इतका आहे. एप्रिल महिन्यामध्ये भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पहिल्या अंदाजामध्ये मान्सून सामान्य म्हणजे 96 टक्के ते 104 टक्के इतका राहील असे सांगितले होते. नव्या अंदाजात त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल असे संकेत दिले आहेत.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसIndiaभारतPunjabपंजाब