शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे भारत बायोटेकचे प्रमुख संतापले, नेतेमंडळींना खडेबोल सुनावले

By बाळकृष्ण परब | Updated: January 4, 2021 18:12 IST

Corona vaccine Update : कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितोमाझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाहीआम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत

हैदराबाद - कोरोनाविरोधातील स्वदेशी लस असे कौतुक झालेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला शनिवारी मान्यता मिळाली आहे. मात्र कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकारणाशी संबंध नाही आहे, असे कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केले आहे.ते म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितो. माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. काल कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याची घोषणा डीजीसीएकडून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर, तसेच जयराम रमेश यांनी या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्य काही लोकांनीही याबाबतच्या निर्णयावर शंका घेतली होती.

कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांबाबतची माहिती जाहीर करताना कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, आम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि इतर देशांमध्येही चाचण्या घेत आहोत. भारत बायोटेक ही केवळ भारतीय कंपनी नाही तर ती जागतिक कंपनी आहे.आता अनेकजण आम्ही पुरेशी माहिती देत नसल्याचा तसेच माहितीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आहेत. माझ्यामते अशा मंडळींनी इंटरनेटवर शोध घेऊन विविध आंतरराष्ट्रीय पत्रकांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वाचावी. या लसीवर सुमारे ७० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. असे भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी सांगितले आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आहे. या लसीमुळे भारत हा कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. मात्र कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे लसीबाबतची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झाली नसताना कोव्हॅक्सिन या लसीला कशी काय मान्यता देण्यात आली. असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य