विनाअनुदानित गॅस सिलिंडर ११३ रूपयांनी स्वस्त
By Admin | Updated: December 1, 2014 16:06 IST2014-12-01T16:06:38+5:302014-12-01T16:06:38+5:30
विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ११३ रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विनाअनुदानित गॅस सिलिंडर ११३ रूपयांनी स्वस्त
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ११३ रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विनाअनुदानित गॅसच्या दरात कपात करण्याच्या निर्णयाबरोबरच जेट इंधनांच्या दरातही ४.१ टक्के कपात करण्यात आल्याची घोषणा तेल कंपन्यांनी सोमवारी केली.
१४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ११३ रूपयांनी कपात करण्यात आल्याने ८६५ रूपयांना मिळणा-या सिलिंडरसाठी ग्राहकांना आता केवळ ७५२ रूपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याने दिल्ली तेल कंपन्यांनी ४.१ टक्के दराने जेट इंधनांच्या दराच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ही वर्षभरातील पाचव्यांदा कपात करण्यात आली असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.