शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतुकीसाठी काही राज्यांकडून असहकार्य, रेल्वे मंत्रालयाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 05:54 IST

असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यात रेल्वे वाहतुकीवरून वाद थांबायला तयार नाही. अनेक राज्ये अशी आहेत की, ती त्यांच्याकडे रेल्वेगाड्या येऊ देत नाहीत, असे केंद्राने आधीच म्हटलेले होते. यामुळे त्या त्या राज्यांत अडकून पडलेले स्थलांतरित कामगार व इतर लोकांना त्यांच्या राज्यांत परत पाठवण्याच्या कामात अडथळे आले आहेत. असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.असे प्रश्न पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, पश्चिम बंगालने आठ मेपर्यंत आठ रेल्वेगाड्यांना येऊ दिले जाईल, असे म्हटले होते. परंतु, आजही या रेल्वे धावलेल्या नाहीत. पश्चिम बंगालसाठी फक्त दोन रेल्वेगाड्या धावल्या आहेत. पश्चिम बंगालच्या असहकार्यामुळे त्या राज्यात राहणाऱ्यांचीच अडचण झाली आहे असे नाही तर त्या राज्यात अडकून पडलेल्यांना तेथून बाहेर काढता येत नाही.रेल्वे मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘महाराष्ट्रातही अशाच अडचणी येत आहेत. महाराष्ट्र बाहेरून रेल्वे येऊ देण्यात सहकार्य करत नाही. इतर राज्यांत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या राज्यात परत येण्यात अडचणी येत आहेत तसेच महाराष्ट्रातून बाहेर राज्यांत जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्राने रेल्वेंची संख्या वाढवावी व रेल्वेंना येऊ देण्यात सहकार्य करावे.’’

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत