शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व अमान्य; सोनिया गांधींनी बोलावली गुरुवारी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 06:05 IST

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया ...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची येत्या गुरुवारी बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी, विधानसभांतील काँग्रेस गटनेते, प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या आगामी रणनीतीबाबत चर्चा करण्यात येईल.

या बैठकीबद्दलची माहिती संबंधित नेत्यांना काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कळविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्या, मंगळवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेसला फारसे महत्त्व मिळणार नाही, याचे संकेत सोनिया गांधी यांना मिळाले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए स्थापन झाली. मात्र, बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन झाली तर तिचे नेतृत्व काँग्रेसकडे येणार नाही, हे स्पष्ट आहे.

प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी का?

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब आदी राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका यांच्याबाबत काय रणनीती असावी, याविषयी काँग्रेस नेते गुरुवारच्या बैठकीत चर्चा करतील. बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसने  राज्यस्तरावर प्रादेशिक पक्षांशी युती करावी का यावरही या बैठकीत खल होईल, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अन्य महत्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा हाेणार आहे. बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसणे हा काँग्रेससाठी सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळेच काँग्रेसला संभाव्य तिसऱ्या आघाडीपासून लांब ठेवण्याचे काही पक्षांचे प्रयत्न आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस