शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 17:25 IST

B S Yediyurappa : कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

B S Yediyurappa ( Marathi News ) :कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. POCSO प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.  काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. अटकेच्या भीतीने येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. 

अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

१७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यानुसार खटला चालवला जात आहे. लैंगिक छळ प्रकरणी सीआयडीने बुधवारी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना चौकशीसाठी बोलावले. येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली. पण, आज गुरुवारी बंगळुरू न्यायालयाने बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

मुलीच्या आईने १४ मार्च रोजी सदाशिवनगर पोलिस ठाण्यामध्ये येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध POCSO आणि कलम 354A अंतर्गत गुन्हा दाखल केला. "ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली, तेव्हा ते एका प्रकरणात मदतीसाठी येडीयुरप्पा यांच्या घरी गेले होते", असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. 

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यात त्यांनी म्हटले की, कारण हा खटला रद्द करण्यात यावा, कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासारखे काहीही नाही.

तपासात पूर्ण सहकार्य केले

येडियुरप्पा म्हणाले की, २८ मार्च रोजी दिलेल्या नोटीसनुसार मी सुनावणीला हजर राहिलो आणि तपासात पूर्ण सहकार्य केले, मात्र पुन्हा १२ जून रोजी दिलेली नोटीस काल माझ्यापर्यंत पोहोचली. पक्षाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे यावेळी मी सुनावणीला उपस्थित राहू शकत नाही. १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला मी स्वतः उपस्थित राहीन. यापूर्वीही मी तपासात सहकार्य केले आहे. काही कारणांमुळे मी यावेळी तपासात सहभागी होऊ शकत नाही.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatakकर्नाटकPoliceपोलिस