शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

Pradeep Mehra Running Noida Viral Video: प्रदीपच्या मदतीला धावले एक्स आर्मी ऑफिसर; थेट रेजिमेंटशी केली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:38 IST

सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रदीप मेहरा या युवकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे.

Pradeep Mehra Running Noida Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रदीप मेहरा या युवकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे. रात्री १२ वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी हा व्हिडीओ शूट करून तो शेअर केला आहे. प्रदीपच्या जिद्दीचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतक लेफ्ट.जन.(नि) सतीश दुआ (Retired General Satish Dua) प्रदीपच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

चित्रपट निर्माते विनोद कापरी रात्री नोएडामधून आपल्या कारमधून जात असताना त्यांना खाद्यावर बॅग घेऊन धावत जाणारा एक मुलगा दिसला. त्यांनी त्या मुलाला (प्रदीप) त्यांच्या कारमधून घरी सोडण्याची अनेक वेळा ऑफर दिली, परंतु त्याने नकार दिला. त्यांनी विनोद कापरी यांना जे सांगितले ते ऐकून तुम्हीही विचार कराल की आयुष्यात प्रत्येकाला समस्या येतात, पण हार मानण्याऐवजी त्यांच्याशी लढले पाहिजे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.सतीष दुआ यांचा मदतीचा हातव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ यांनीदेखील प्रदीपसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची प्रशंसा केली आणि त्याच्या योग्यतेच्या आधारावर भरती परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्यास कुमाऊं रेजिमेंटचे कर्नल, माजी लष्कर कमांडर जनरल राणा कलिता यांच्यासोबत चर्चा केली आहे. आपल्या रेजिमेंटमध्ये भरती करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न करु असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी दिल्याचं सांगितलं.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल