शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

खासगी नोकरी सोडून कायद्याचे शिक्षण घेतले; 10 वर्षांनंतर वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 14:41 IST

नोएडातील एका वकिलाची कहानी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.

नोएडा: नोएडातील एका वकिलाची कहानी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. एका कंपनीत खासगी नोकरी करणाऱ्या आकाश चौहान यांनी वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आधी एलएलबीचे शिक्षण घेतले आणि दहा वर्षांनी स्वत:च वकिली करत दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी आकाश चौहान यांच्या वडिलांचा वाळू माफियांनी घरात घुसून दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेनंतर वर्षभरातच लहान भावाचा मृतदेहही रेल्वे रुळावर सापडला. या दोन घटनांनंतर त्यांच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली, पण त्यांनी बंदूक उचलली नाही, उलट कायद्याचे शिक्षण घेतले. स्वत: वडील आणि भावाचे प्रकरण पुन्हा सुरू केले आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. 

दहा वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? आकाश चौहान यांचे वडील पाले राम चौहान सामाजिक कार्यकर्ते होते. यमुनेतील बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. स्थानिक पातळीवर कोणतीही सुनावणी होत नसल्याने, त्यांनी 2012 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. याचा राग आल्याने वाळू माफियांनी 31 जुलै 2013 रोजी भरदिवसा त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. या घटनेच्या सुमारे 10 महिन्यांनंतर आकाशच्या धाकट्या भावाचा मृतदेहही दिल्लीतील नरेला भागात रेल्वे ट्रॅकवर सापडला होता.

या दोन घटनांनंतर आकाश यांनी पोलिस स्टेशनच्या अनेक फेऱ्या मारल्या, पण पोलिसांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. त्या काळा त्यांनी माजी सरकारी वकील के.के. सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या सल्ल्याने आपली प्रस्थापित नोकरी सोडून ग्रेटर नोएडा येथील कॉलेजमधून एलएलबी केले. वकील झाल्यानंतर त्यांनी स्वत: वडिलांच्या खुनाचा खटला लढवला. त्यांना कोर्टात के.के.सिंग यांचीही साथ मिळाली आणि दहा वर्षांच्या खडतर संघर्षानंतर आता चार आरोपींपैकी दोन आरोपी राजपाल चौहान आणि त्यांच्या एका मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलPoliceपोलिस