वाहतूक विभागाच्या एनओसीऐवजी द्यावे लागणार हमीपत्र

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30

पुणे : शहरातील इमारती, मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट, चित्रपटगृहे यांना पार्किंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच काढले आहेत. मात्र इमारतींचे बांधकाम चालू असेपर्यंत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर येऊ देणार नाही तसेच इमारत पूर्ण झाल्यावर गाडया रस्त्यावर लावल्या जाणार नाहीत असे हमीपत्र बांधकाम व्यावसायिकने नकाशे मंजुर करण्यापुर्वी देणे बंधनकारक आहे.

NOC of the transport department has to be replaced instead of the guarantee letter | वाहतूक विभागाच्या एनओसीऐवजी द्यावे लागणार हमीपत्र

वाहतूक विभागाच्या एनओसीऐवजी द्यावे लागणार हमीपत्र

णे : शहरातील इमारती, मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट, चित्रपटगृहे यांना पार्किंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच काढले आहेत. मात्र इमारतींचे बांधकाम चालू असेपर्यंत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर येऊ देणार नाही तसेच इमारत पूर्ण झाल्यावर गाडया रस्त्यावर लावल्या जाणार नाहीत असे हमीपत्र बांधकाम व्यावसायिकने नकाशे मंजुर करण्यापुर्वी देणे बंधनकारक आहे.
वाहतूक विभागाकडून पार्किंगच्या एनओसी मिळण्यामध्ये अडचणी येत असल्याच्या मोठयाप्रमाणात तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. बांधकाम विकास आराखडयानुसार (डीपी) पार्किंगची पाहणी करून त्याला परवानगी देण्याचे संपुर्ण अधिकार महापालिकेला असल्याने वाहतूक विभागाच्या एनओसी आवश्यकता नसल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. त्याबाबतच्या सुचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
इमारतीचे बांधकाम सुरू असताना मात्र बांधकामाचे साहित्य कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर येणार नाही. इमारत पूर्ण झाल्यानंतर इमारतीमध्ये येणार्‍या गाडया रस्त्यावर येणार नाहीत याची जबाबदारी विकसकाला घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचे हमीपत्र नकाशे मंजूर करण्यापूर्वी विकसकाने देणे बंधनकारक आहे.

Web Title: NOC of the transport department has to be replaced instead of the guarantee letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.