कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नका - पंतप्रधान

By Admin | Updated: March 9, 2015 16:19 IST2015-03-09T12:48:24+5:302015-03-09T16:19:13+5:30

आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला लगावत देशाची एकात्मता व अखंडतेबाबत कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Nobody should teach us patriotism - PM | कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नका - पंतप्रधान

कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नका - पंतप्रधान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ -  देशाची एकात्मता व अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलमच्या सुटकेबाबतचा आक्रोश हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व देशाचा असून असून यात पक्षीय राजकारण नको असेही त्यांनी सुनावले.
फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्यानंतर याच मुद्यावर लोकसभेत स्पष्टीकरण देताना त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असे स्पष्ट केले. फुटीरतावादी व दहशातवादाविरोधात लढा देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत याप्रकरणी योग्य ती पावले उचलू असे आश्वासनही त्यांनी दिले.
मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा केलेली नाही असे सांगत काश्मीरमधील घटनांबद्दल आम्ही अनभिज्ञ असल्याचेही ते म्हणाले. 
मसरत आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे.

 

Web Title: Nobody should teach us patriotism - PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.