शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
2
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
3
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
4
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
5
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
6
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
7
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
8
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
9
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
10
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
11
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
12
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
13
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
14
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
15
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
16
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
17
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
18
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
19
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
20
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!

"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:58 IST

पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असंही चंद्राबाबू नायडू म्हणाले.

N. Chandrababu Naidu on Operation Sindoor:  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यासह भारताने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानलाही कडक इशारा दिला.  ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगभरातल्या देशांमध्ये जात पाकिस्तानची पोलखोल केली. त्यामुळे जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आलं. आता एनडीएतील महत्त्वाचे घटक असलेल्या एन. चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असं टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.

विरोधकांना नेहमीप्रमाणे आशा होती की कधीतरी चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना विरोध करायला सुरुवात करतील. पण नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्या उलटच झाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी सरकारच्या सर्व मुद्द्यांवर भाजप आणि पंतप्रधान मोदींना उघडपणे पाठिंबा दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचे उघडपणे कौतुक केले. मोदी सरकारसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने हे काम करू शकला नसता, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष रोखण्यात पंतप्रधान मोदींनी भूमिका बजावली, असंही चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं.

"१०० टक्के, हे (ऑपरेशन सिंदूर) मोदी सरकारचे एक यश आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने आणि कार्यक्षमतेने हे करू शकला नसता. पहलगाम दहशतवादी हल्ला दुर्दैवी होता, ज्यामध्ये पतींना त्यांच्या पत्नींसमोर मारण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाईला "ऑपरेशन सिंदूर" असे नाव दिले, ज्यामध्ये भारतीय महिलांच्या भावनांचा आदर करण्यात आला. २० मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि नागरिकांवर आणि संरक्षणाच्या संदर्भातील ठिकाणांवर कोणताही हल्ला झाला नाही. वेळीच संघर्ष थांबवण्यात आला. पंतप्रधान मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी झाले. जर ते जास्त काळ चालू राहिले असते तर आपले नुकसान झाले असते," एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले.

"भारताला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण आम्हाला कोणत्याही शिफारशी किंवा पाठिंब्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर एक मोठे नेते म्हणून उदयास येत आहेत, जी भारतासाठी अभिमानाची बाब आहे," असंही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी